News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

पहिला पेपर उद्या सकाळी 11 ते 2 वाजताच्यादरम्यान इंग्रजी विषयाचा होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून जवळपास 14 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : राज्यात आजपासून (21 फेब्रुवारी) बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. पहिला पेपर आज सकाळी 11 ते 2 वाजताच्यादरम्यान इंग्रजी विषयाचा होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून जवळपास 14 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी तर 6 लाख 48,151 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. बेस्टकडून विशेष सवलत बेस्ट बसकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. बेस्टने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी परीक्षेचे हॉलतिकीट दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास करु शकतात. तसंच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजाने गाडीत प्रवेश करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
Published at : 20 Feb 2019 09:38 PM (IST) Tags: english exam hsc students

आणखी महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar: शाहु-फुले-आंबेडकरांची विचारसरणी मानणारे अजित पवार यंदा संघाच्या रेशीमबागेतील बौद्धिकाला हजेरी लावणार का?

Ajit Pawar: शाहु-फुले-आंबेडकरांची विचारसरणी मानणारे अजित पवार यंदा संघाच्या रेशीमबागेतील बौद्धिकाला हजेरी लावणार का?

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण

Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा

Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; बीड-परभणीच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत होणार चर्चा

Weather Update: महाराष्ट्र थंडीने गारठला! महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले, विदर्भात थंडीची लाट, तापमान किती अंशावर.. जाणून घ्या

Weather Update: महाराष्ट्र थंडीने गारठला! महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले, विदर्भात थंडीची लाट, तापमान किती अंशावर.. जाणून घ्या

टॉप न्यूज़

Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 

Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर

महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती

महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?

Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?